Posts

आठवणी...

आठवणी... जे माझ्या मनात आहे ते मी बोलणार नाही हरवलेली वाट धुक्याची मी शोधणार नाही जरी पाहीले मी चांदण्यात फिरताना तुला डोळे मिटून मी चांदणे विसरणार नाही केले जरी आता तू फीतूर चांदण्यांना जरी बाग तुझ्या बहाण्यांची मी शिंपणार नाही सुगंध आता जरी तू शिंपडून आली बरी वाटते जे तूला मात्र आता घडणार नाही धुंडाळून पाहीले जरी मज तू रानोरानी आयुष्य गत जन्माचे पुनःश्च स्मरणार नाही आले जरी भरोनी वादळी ढग आसवांचे चिंब भिजून आता तरीही मी रडणार नाही श्री.प्रकाश साळवी दि. १३-०१-२०१४

गीत ऐक्याचे ।

गीत ऐक्याचे । या सुरांनो या मैफिलित माझ्या या फुलांनो या ओंजळीत माझ्या गाऊ गीत सामंजस्याचे अन् प्रेमाचे पसरऊ सुगंध ऐक्याचे अन् मानवतेचे या मुलांनो या शाळेत माझ्या गाऊ गीत सत्यतेचे शाळेत माझ्या मी मराठी मराठीच बाणा माझा शिवराय आमुचे दैवत महाराष्ट्र माझा या रे या दीन दलीतांनो झोपडीत माझ्या मीठ भाकरी खाऊ झोपडीत माझ्या गाणे जुनेच माझे गाऊ नव्या स्वरात एक संघ होवू या नव्या युगात श्री. प्रकाश साळवी दि. 12/01/2015

कलिका !

कलिका ! तू पाहीलेस मागे वळूनी अन् बहरले झाड फुलांचे डोळ्यांचे लवते पाते अन् भरून नभ आले चांदण्यांचे हलकेच हास्य ऊधळूनी साठविले नयनात माझ्या तू कोमल कलिका फुलली ह्रूदयाच्या आठवणीत माझ्या वय तुझे फुलण्याचे तू फुलपाखरासम फुलत रहा हास्यात तुझ्या रंगुन जाऊ दे; तू नभाकडे पहा श्री.प्रकाश साळवी

ध्यास...

ध्यास... का शोधतात तुला? तु असुन जवळ का नसेल त्यांचे मन निर्मळ? चरा चरात तूच आहेस सामावलेला तरू लता वल्ली फुले आणि वाहते जल तू आहेस अंतरात पण दिसत नाहीस तू आहेस प्राणिमात्रात पण समजत नाहीस तू आहेस गितात तू आहेस संगितात तू आहेस निरागस बालकात खगात ऊडणा-या पाखरात पण कोणासच जाणवत नाही तूच आहेस मनात तूच आहेस रानात तूच आहेस जनात सारे विश्व तूच आहेस मग असा लपुन का रहातोस? का सा-यांना तीर्थक्षेत्री फिरवतोस? म्हणतात तूच कर्ता तूच करविता चांगल्या वाईटाचा तूच निर्माता मग सर्वांना चांगली बुध्दी का देत नाहीस? तुला शोधायला कुणी करतात ऊपास तापास कोणी होतात विठ्ठलाचा दास कधी देणार दर्शन? आता फक्त तूझीच आस तूझाच ध्यास तूझीया नामाची कास मन झालय व्याकूळ तूझ्याच भेटीची तळमळ रात्रंदिन एकच ध्यास मला व्हावं तूझं दर्शन श्री.प्रकाश साळवी दि.22/11/2014, 14:30

हताश

हताश का जखमांचे ओझे ऊरी वाहतो मी? का मलमांचे लेप पुन्हां लावतो मी? जगण्यात मौज मोठी काय कळणार तुला? चटके ऊन्हाचे का ऊगा सोसतो मी? दोन दिवसांचे आयुष्य आहे फुलांना सुगंधात सारे भिजवून टाकतो मी ऊठ वेड्या नको हताश होऊ तू एवढ्यात सारे जीवन ओवाळून टाकतो मी सकारात्मक थोडे जगुन पहा नकाराचे हे दान तुजकडे मागतो मी श्री.प्रकाश साळवी दि.14/11/2014

प्रतारणा

प्रतारणा प्रतारणा करू किती तरी मनाशी? दिखावेच सारे सांगू कसे जनाशी? फूलून यावी प्रीती बकुळ फूलापरी नाते जुळुन यावे कसे मनाचे मनाशी शब्दात शब्द व्हावे जसा सुगंध फुलांचा न रूचे खोटेपणा हा चिकटलो या पणाशी जरासा भूललो मी दांभिकपणाला जगणे आपले जुळले प्राक्तनाशी आताच थोडे धुंदीत रान प्यालो कोरड्याच आशा गुंफित जिवनाशी सांगू कसे कुणाला ईतीहास या व्यथांचे शोधित राहीलो सुखाला मन्मनाशी श्री. प्रकाश साळवी दि. 06/10/2014

अनाहूत ....

अनाहूत .... जाता तू पाऊलांचे ठसे ऊमटून गेली ह्रदयात माझ्या शिल्प तू कोरून गेली नयनात तूझीया ढग दाटून आले पापण्यांची फूले ईथे बरसून गेली लाजणे फूलापरी फूलपाखरू बनावे मनाची फूले ह्रदयी ऊमलून गेली शब्दात काय सांगू अपूरेच सारे ही रात्र सारी ह्रदय चोरून गेली पाहिले मागे वळून हासुन जेंव्हा गूज अंतरीचे परी सांगून गेली लावण्य तूझे मज भूलवून गेले क्षणात मती काही कुंठून गेली श्री. प्रकाश साळवी दि. 16/09/2014